श्रीयश  एज्युकेशन  फौंडेशन

“समाज्यातील अगदी तळागाळातील महिलांचा विकास घडवायचा असेल तर प्रत्येक स्त्री स्वावलंबी झाली पाहिजे ”

व्यावसाईक प्रशिक्षण

कौशल्ये शिकवून व्यक्तीला उद्योगासाठी तयार करणे.

महिला सशक्तीकरण

महिलांना समान अधिकार, स्वातंत्र्य आणि संधी प्रदान करणे.

व्यक्तिमत्त्व विकास

व्यक्तीचे आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि नेतृत्व क्षमता वाढविणे.

महिला स्वावलंबीकरण

महिलांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या स्वतंत्र बनविणे.

संस्थेविषयी

श्री. सौ. एस. एस. सावंत यांचे मार्गदर्शनाखाली २०१० मध्ये  श्रीयश  एज्युकेशन  फौंडेशन ही संस्था स्त्रीयांच्या सर्वागिण विकासासाठी स्थापन झाली. “समाज्यातील अगदी तळागाळातील महिलांचा विकास घडवायचा असेल तर प्रत्येक स्त्री स्वावलंबी झाली पाहिजे ” हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. कारण स्वावलंबना शिवाय सामाजिक आणि आर्थिक विकास अशक्य आहे. म्हणुनच संस्थेमार्फत ग्रामीण आणि शहरी महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या  दृष्टीने  वर्षभर अनेक कोर्सेस उद्योगाविषयी  विविध  उपक्रम  राबविले  जातात.
संस्थेमार्फत अनेक यशस्वी सामाजिक उपक्रम  राबविले  जातात. स्त्री आरोग्य, माता बालसंगोपन,  प्रौढ साक्षरता , अंधश्रद्धा  निर्मूलन, अन्यायाविरुद्ध  लढा, व्यसनमुक्ती, निराधार  व विधवा  महिलांचे  पुनर्वसन, वृद्धाश्रम  अशा  सर्व  उपक्रमांव्दारे  महिला  एकिकरणाचे  काम  संस्था  करीत  आहे.

प्रतिनिधी

Mrs. Supriya Shrikrishna Sawant

President

Mrs.Hemlata Phadtare

Vice President

Mrs. Rajashri Uttam Shid

Secretery

संस्थेचे उपक्रम

श्रीयाश शैक्षणिक फौंडेशनने महिलांच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवून त्यांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवले आहे